Homeचंद्रपूरजिवतीशाळापूर्व तयारी मेळावा.... जी.प.उ.प्रा.शाळा माराईपाटण येथे मोठ्या उत्साहात संपन्न... बळीराम...

शाळापूर्व तयारी मेळावा…. जी.प.उ.प्रा.शाळा माराईपाटण येथे मोठ्या उत्साहात संपन्न… बळीराम काळे, जिवती

जिवती : (तालुका प्रतनिधी) पंचायत समिती जिवती,तालुका अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम व नेट कनेक्टिवीटी नसलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माराईपाटण येथे शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक वर्ग आणि पालकांच्या उपस्थितीत शाळेचा पहिला दिवस मेळावा क्र.2 मोठ्या थाटा माटात साजरा करण्यात आला.

सदर मेळाव्याला उपस्थित शा. व्य. समितीचे अध्यक्ष विलास करपते, उपाअध्यक्ष प्रदीप काळे,तर उद्धघाटक ग्राम.पं.
माराईपाटणचे उपसरपंच विकास सोनकांबळे,ग्राम. प.सदष्य सितल मोहन कांबळे,महादाबाई शेषराव सोनकांबळे, जि. प. ऊच्च प्राथमिक शाळेला नव्याने नुकतेच रुजू झालेले
मुख्याध्यापक आसामपल्लीवार सर,दिनकर गायकवाड सर, पत्रुजी गायकवाड सर ,बानकर सर,जरिले सर,बळीराम काळे, सौ.सत्यशिला लव्हराळे,सौ.रेखाताई लव्हराले ,सौ. दैवशाला उमेद अभियानांतर्गत कार्यरत कॅडर सौ.संगीता काळे,प्रियंका काळे,सुकेशेनी बनसोडे,गौतम सोनकांबळे,अंगणवाडी सेविका विमलताई लांडे ,इतर सदस्य आणि पालक वर्गाच्या उपस्थितीत वर्ग १ ली.ते ७ वी पर्यंत दाखल पात्र विद्यार्थाचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आणि नव्या दाखलपात्र मुलांची तयारी आणि दाखल पात्र विद्यार्थाचे हाईट व वजन देखील करण्यात आले.इत्यादी विषय सदर मेळाव्यातून साध्य झाले.
आणि मुख्याध्यापक आसामपल्लीवार यांनी आपल्या
प्रास्ताविक भाषणातून /शब्दातून विद्यार्थांना व पालक वर्गांना सूचित केले की,आपल्या पाल्यास नियमित शाळेत पाठउन सहकार्य करावे.जे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत शिकवलेले अभ्यासक्रम पालकांनी आपल्या मुलांना विचारले पाहिजे आणि त्याचे अवलोकन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक जरीले सर यांनी केले.तर आभार सहायक शिक्षक बानकर सर यांनी व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!