Homeचंद्रपूरपुष्पा पोडे(पाचभाई) ठरल्या नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारच्या मानकरी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु...

पुष्पा पोडे(पाचभाई) ठरल्या नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारच्या मानकरी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराचे वितरण

चंद्रपूर ः नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने येथील शासकीय रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना गुरुवार (ता. २२) सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपती राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते पुष्पा पोडे यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुष्पा पोडे (पाचभाई) या महाराष्ट्रातील एकमेव नर्सिंग अध्यापिका आहेत हे विशेष.
मूळच्या पुष्पा पोडे या चंद्रपूरच्या. त्या मागील २२ वर्षांपासून नर्सिंग क्षेत्रातील विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहे. अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयातून पुष्पा पोडे यांनी आपल्या कार्याची सेवा सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यासारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी अविरत पाच वर्षे सेवा दिली. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात त्यांची बदली झाली. येथेही त्यांनी रुग्णसेवा केली. कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कोरोनाशी लढण्यासाठी तयार केले. कोरोनासारख्या आपत्ती काळात त्यांनी स्वतःला अविरत झोकून देऊन रुग्णांची सेवा केली. अनेकांचे प्राण वाचवले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडियाने नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली होती. गुरुवार (ता. २२) दिल्ली येथे एका कार्यक्रमात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढेही आपले हे सेवाकार्य सुरू ठेवण्याचे निश्चय त्यांनी केला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!