चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी…

1813

चंद्रपूर: जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातून मंगळवारी पहाटेच्या सुमारास चार दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान महिला आरोपीला अटक करण्यात आली असून बाळ सुखरूप असून बाळाला आईच्या सुपूर्द करण्यात आले आहे.

  1. मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका चार दिवसीय बालकाची चोरी झाली. सुरुवातीला नातेवाईकांनी बाळाला कोवळे उन्ह दाखवायला बाहेर नेले असेल असा मातेचा समज झाला, मात्र नातेवाईकांनी बाळाला बाहेर नेले नसल्याचे स्पष्ट होताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली. रुग्णालयात सर्वत्र शोधाशोध करूनही बाळ आढळून न आल्याने रुग्णालय प्रशासनाने पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांना तक्रार प्राप्त होताच रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासणे सुरू केले. सर्व यंत्रणा कामाला लागली. अवघ्या ३ तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांना चोरी झालेले बाळ वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे मिळाले. झेबा शेख या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. बाळाची प्रकृती उत्तम असून बाळाला आईच्या सुपूर्द करण्यात आले आहे.