जिवती :(ता. प्र.) टेकामांडवा येथील रहिवासी दत्ता जनार्धन दोरे (वय ४८) यांचा दिनांक १३ जून २०२२ रोज मंगळवारला अचानक सकाळी ०६:३० वाजताच्या दरम्यान अचानक त्यांच्या राहते घरी जिवती येथे प्राणज्योत मालवली.
दत्ता जनार्धन दोरे (४८) यांच्या अचानक अशा एकदम झालेल्या दुःखद निधनामुळे टेकामांडवा व जिवती येथील मित्र परिवार नातेवाईक,गावकरी व परिसरातील मित्रमंडळीत शोकाकळा पसरिली आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार सायंकाळी ६:३० वाजता दिनांक १३ जून २०२३ रोज मंगळवारला जड अंतकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शेकडो नागरिकांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंड असा परिवार आहे.