Homeगोंडपीपरी✊आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करावी... क्रांतिवीर बिरसा मुंडा संघर्ष...

✊आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करावी… क्रांतिवीर बिरसा मुंडा संघर्ष समिती शाखा-गोंडपिपरी संघटनेची मागणी✊

गोंडपिपरी- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलगी आलापली येथे इयत्ता दहावी पास झाल्यानंतर टी.सी. काढण्यासाठी आली असता,नराधमाणे मुलीला तुला गावाला नेऊन देतो . म्हणून मित्राच्या खोलीवर घेऊन गेला.मुलीला पाण्यात गुंगीचे औषध मिसळून दिला. ती मुलगी बेशुद्ध पडल्यावर मानतेला काडीमा फासणारे दोन नराधमानी आळीपाळीने अत्याचार केला.

सदर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून आरोपीवर पोस्को तथा ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून, कठोर कारवाई करावी.या निषेधार्थ क्रांतिवीर बिरसा मुंडा संघर्ष समिती शाखा गोंडपिपरी यांनी माननीय, तहसीलदार तालुका दंडाधिकारी साहेब गोंडपिंपरी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना  सुनील संकुलवार नगरसेवक, प्राचार्य सुरेश पेंढारकर अध्यक्ष, कुमारी मनीषा मडावी नगरसेविका, सौ सारिका मडावी नगर उपाध्यक्ष, सौ प्रणिता उईके महिला प्रतिनिधी, हिराजी कन्नाके सचिव, अनिल पेंढारकर उपाध्यक्ष,इंद्रपाल मडावी मुख्य सल्लागार, संतोष पेंदोर ,महादेव गावडे, सुधाकर मडावी, साईनाथ कोवे, कुमारी सपना चांदेकर, बाळू शेडमाके, सुधाकर कुलसंगे इतर आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती.

.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!