Homeचंद्रपूरजिवतीआदिवासी बहुल अतिदुर्गम मौजा भारी येथील आश्रम शाळेमध्ये "शासन आपल्या दारी" अभियान...

आदिवासी बहुल अतिदुर्गम मौजा भारी येथील आश्रम शाळेमध्ये “शासन आपल्या दारी” अभियान संपन्न…. विविध योजनांचा लाभ लाभार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप…

बळीराम काळे, जिवती

जिवती : (तालुका प्रतनिधी) आज दिनांक 8 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या” शासन आपल्या दारी” योजनेअंतर्गत जीवती तालुक्यातील डोंगराळ व अतिदुर्गम जिवती तालुक्याची ओळख असणाऱ्या ग्रामीण भागातील व शेवटच्या टोकावर असलेल्या भारी येथील आश्रम शाळा मध्ये “शासन आपल्या दारी, अभियान राबविण्यात आले.

त्या दरम्यान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे,आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनय गौडा (जिल्हाधिकारी चंद्रपूर), प्रमुख मार्गदर्शक (विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी) जि.प.चंद्रपूर,प्रमुख मार्गदर्शक एम.मुरुगनंथम (प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रपूर,तसेच राजूरा येथील उपविभागीय अधिकारी संपत खलाटे साहेब आणि आजच्या “शासन आपल्या दारी”या अभियानांतर्गत विनय गौडा यांनी “शासन आपल्या दारी”हा उपक्रम राज्य सरकारने एक अत्यंत महत्वकांक्षी उपक्रम आहे.जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या हकाचे लाभ देणे आणि वेगवेगळ्या संबंधित विभागणी एकत्र येऊन एकाच छताखाली नागरिकांपर्यंत योजना पोहचविणे,हाच मुख्य हेतू आहे. असे आपल्या वाणीतून स्पष्ट पटवून सांगितले.

कार्यक्रमाच्या तत्पूर्वी विदर्भाचा बुलंद आवाज शाहीर संभाजी ढगे आणि त्यांचा संच यांनी या योजनांची अंमलबजावणी त्यांच्या गायनाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित असलेल्या समाजास अवगत केले.”शासन आपल्या दारी ” शाकीय योजना कल्याणकारी,विकास करण्या “शासन आपल्या दारी ” या गीत गायनातून संगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी विवध योजनांचा लाभ द्यावा आणि त्या लाभाचा पाठपुरावा लाभार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन केले.

तसेच आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी संगितले की,भारी हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमा लगत असलेले भारी गाव आहे.”शासन आपल्या दारी “या अभियानांतर्गत आज आयएसआय अधिकारी चंद्रपूर जिल्हाचे प्रामुख्याने लाभले म्हणून शासन योजना तयार करण्यात येत असते परंतु,त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे.

त्यावेळी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जननी सुरक्षा योजना, आदिवासी मातृत्व योजना ,तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत निक्षय पोषण योजना च्या लाभार्थ्यांना दर महा 500/-आर्थिक लाभ दिल्या बाबतचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .
तसेच आरोग्य विभागामार्फत क्षयरोग, हिवताप, हत्तीरोग ,कुष्ठरोग आदींची प्रदर्शनी लावण्यात आली. व या व्यतिरिक्त सर्व आरोग्य विभागाच्या योजनांचे फलके सुद्धा प्रदर्शित करण्यात आली होती. उपस्थित गावकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची मधुमेह ,रक्तदाब व इतर आजारांची तपासणी करण्यात आली.

त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव उपकेंद्र भारी येथील अधिकारी व कर्मचारी हजर होते. या उपक्रमाची चांगली तयारी जिवती तालुका प्रशासनाने केली.असे सुभाष भाऊ धोटे यांनी सांगितले.तर प्रास्ताविक तहसीलदार दिपक वाझाडे, सूत्रसंचालन अरूणा कवठे यांनी केले. आभार संपत खलाटे यांनी व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!