विठ्ठल मंदिर वॉर्डातील नाल्या तुंबल्या… शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांचे मनपा आयुक्तांना निवेदन

924

चंद्रपूर:येथील विठ्ठल मंदिर वार्डातील नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. वार्डातील नाल्यांची लवकरात लवकर स्वच्छता व्हावी याकरीता बुधवारी (ता. ३१) ला शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना निवेदन दिले. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मनपाकडून नाल्यांची कुठल्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नाही.यामुळे नाल्यांमध्ये घाणाचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर शहरातील नाले सफाईची पूर्ण कामे व्हावी असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बरेचदा दुर्गंधी युक्त पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका असतो.मनपाचे काम कासवगतीने सुरू आहे.येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील नाल्यांची लवकरात लवकर सफाई करण्यात यावी.पावसाळ्यापूर्वी नाल्या सफाईचे काम पूर्ण करण्यात यावे. याकरिता मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.