Homeचंद्रपूरमोठी बातमी : बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

मोठी बातमी : बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

चंद्रपूर- यंदाच्या वर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असताना काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील शिक्षकांकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच बारावीच्या परिक्षा सुरू असतानाच काही पेपरफुटीच्या देखील घटना घडल्या होत्या.

त्यामुळे यंदा बारावी बोर्डाचा निकाल वेळेत लागेल की नाही, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण याबाबतची महत्त्वाची माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे. बहुप्रतिक्षीत असा बारावीचा निकाल उद्या (ता. 25 मे) दुपारी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 02 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. (12th board result will be announced tomorrow)

या संकेतस्थळावर पाहू शकतात निकाल
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org आणि http://mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.

*05 जूनला महाविद्यालयात मिळणार गुणपत्रिका*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. पण त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतिक्षा होती ती निकालाची. निकालाची तारीख उद्याची असल्याने उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!