डुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी गोंडपिपरी तालुक्यातील घटना…

688

गोंडपिपरी: रानात बकऱ्या चरायला घेऊन गेलेल्या एका वृध्दावर रानडुकरांनी हल्ला केला.या हल्ल्यात वृध्दाच्या हाता पायाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता.८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. जखमीचे नाव गजानन चनेकर (वय ६०) असे आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील गजानन चनेकर रहिवासी आहे.सोमवारी ते बकऱ्या चरायला घेऊन गेले असता त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला.त्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता नेण्यात आले. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु आहे.