Homeचंद्रपूरराजुराजी.प.प्राथमिक शाळा वरुर रोड येथे शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन

जी.प.प्राथमिक शाळा वरुर रोड येथे शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन

राजुरा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुर रोड येथे वर्ग पहिलीमध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन सोमवारला (ता.१) करण्यात आले. सर्वप्रथम महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दाखलपात्र विद्यार्थ्यांना व पालकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील पहिले पाऊल हा उपक्रम राबवून विद्यार्थ्याना पुस्तकं देण्यात आली. सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाची रूपरेषा, शाळेतील पहिले पाऊल,विकास पत्र यांचे महत्व शाळेतील मुख्याध्यापक श्री. उराडे यांनी समजावून सांगितले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सरपंच गणपत पंधरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश ठावरी, उपसरपंच विजया करमणकर ,शाळा व्यव. समितीचे उपाध्यक्ष रुपाली निमकर, सदस्य सुनील चोथले, नितेश निरंजने,उषा सोयाम, सुमित्रा निकोडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सोयाम,विद्या टेकाम , स्वप्नील जीवतोडे, शिक्षिका सौ. कारमोरे,सौ. नैताम, अंगणवाडी कार्यकर्त्या सौ. निखाडे, सौ. ढुमने तसेच गावातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक , सामाजिक व शारीरिक विकास तपासण्यासाठी ७ स्टाल लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. स्वयंसेवक स्वप्निल जीवतोडे, यांनी पूर्णवेळ देऊन सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कारमोरे यांनी केले.शिक्षिका सौ. नैताम यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य दिले.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना नाश्ता देऊन सर्वांचे आभार मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!