Homeगोंडपीपरीअडेगाव - गोंडपिपरी बससेवा सुरू ठेवण्याची अडेगाव वासियांची मागणी... शरद कुकुडकर...

अडेगाव – गोंडपिपरी बससेवा सुरू ठेवण्याची अडेगाव वासियांची मागणी… शरद कुकुडकर गोंडपिपरी ग्रामीण प्रतिनिधी

 

गोंडपिपरी: गोंडपिपरी ते धामनगांव मार्गे अडेगांव येणारी बस सेवा मे व जून या दोन महिन्यांसाठी शाळा, महाविद्यालयाला सुट्टी असल्याने बंद करण्यात येत आहे. त्यामुळे ही बस बंद न करता पुर्ववत सुरू ठेवावी जेणे करून नागरिकांना येण्या जाण्यास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. यासाठी बस सेवा बंद न करता सुरू ठेवावी अशी मागणी अडेगाव वासिय यांनी केली आहे.
समस्त गावकरी अडेगांव यांच्या अर्जानुसार मौजा अडेगांव येथील बस हि शाळकरी मुलांच्या शाळा संपल्या असून सदर बस बसस्थानक गोंडपिपरी येथून बंद करण्यात येणार आहे. परंतु गोंडपिपरी ते धामनगांव मार्गे अडेगांव बस बंद झाल्यास गावकऱ्यांना जाण्या येण्याचा नाहक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे गावकर्यांचे येण्याचे हाल न व्हावे या दृष्टीने सदर बस बंद न करता चालू ठेवावी असे गावकरी यांनी अर्जात मागणी केली आहे.
यावेळी सरपंच सौ.रेखाताई चौधरी अडेगांव, उपसरपंच विजय चौधरी अडेगांव, सरपंच सुनील झाडे धामणगाव, नंदू ठाकूर, सौ.अर्चना झाडे, सौ. निता झाडे, सौ. वंदना झाडे उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!