Homeचंद्रपूरजिवतीराजू वाघमारे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे पन्नास...

राजू वाघमारे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे पन्नास “बोधीवृक्षाचे वृक्षारोपण

जिवती : (ता.प्र.) बाबासाहेब आंबेडकर भवन, गडचांदूर तह.कोरपना जि चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते आयु. इंद्रराज उर्फ राजू गुलाबसिंग वाघमारे यांचा दिनांक १० एप्रिल २०२३ ला यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई आयु. सुमित्राबाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्नी, मुले, बहिण, भाऊजी आणि आप्तेष्ट मित्रपरिवाराच्या उपस्थितीत ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे ५० बोधीवृक्षाचे वृक्षारोपण साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सुरवातीला ऐतिहासिक बुद्धभूमी येथे राजू वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळी आणि उपस्थित आप्तेष्टांच्या उपस्थित बुद्ध वंदना घेऊन पुढील ५० बोधीवृक्षाच्या सानिध्यात केक कापून मंगलमय कामना व्यक्त करण्यात आल्या.
सदर प्रसंगी बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे गडचांदूर यांनी आयु. राजू यांना ‘ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सर्व भारतीयांनी सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेले प्रकटपत्र’ भेट देऊन राजू यांच्या वाढदिवसानिमित्त मंगलमय कामना करण्यात आली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला आयु. राजू वाघमारे यांच्या वाढदिसानिमित्त बोधीवृक्षाचे वृक्षारोपण करतांनाच्या प्रसंगी गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक व बुद्धभूमीचे व्यवस्थापक राहुल उमरे, बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे, विक्की खाडे, प्रशांत निरंजने, नामदेवराव लांडगे, पद्माकर खैरे, शेखर गावंडे आदी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!