सात्विक जीवन जगण्याचा आधार मार्ग अध्यात्म होय. अध्यात्मातून मनुष्याला बोध मिळतो तर विज्ञानातून शोध वृत्ती चालला मिळते. ग्रामीण भागातील अध्यात्म संस्कृती आजही समाजाला दिशा देण्याचे काम करीत असून भागवत सप्ताह आमचे आयोजनातून गाव एकोबा निर्माण होतो तर भागवत सप्ताहाचा समारोपीय गोपालकाला हा ग्रामातील सद्गुनी विचारांचा मेळ होय. असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
आयोजित गोपालकाला प्रसंगी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते ,आमदार विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, किसान सेलचे नानाजी तुपट, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, माजी प. स. सदस्य थाणेश्वर कायरकर, काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष मंगला लोनबले, माजी जि. प. सदस्य स्मिता पारधी, युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, भक्तीचा खरा मार्ग हा माणुसकी जोपासणे असून जो मनुष्य सेवेला प्राधान्याने अंगीकारतो त्यालाच ईश्वर सेवेचा आनंद मिळतो. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात केवळ राजकारणच नाही तर मतदार संघाचा जनसेवक म्हणून क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजांसह आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. याकरिता क्षेत्रात अनेक नागरिकांना झपाट्याने ग्रासलेल्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी फाउंडेशन मार्फत स्वखर्चातून तब्बल दोन कोटीहून अधिक रुपये खर्चून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी कर्करोग तपासणी व्हॅन ( मेमोग्राफी व्हॅन ) नागरिकांच्या सुविधेत पुढील महिन्यात उपलब्ध करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. या अत्याधुनिक व्हॅनमुळे अनेकांचे जीव वाचवता येईल. आणि हे सत्कार्य करण्याची संधी मला प्राप्त झाली हे माझे अहोभाग्य आहे. यानंतर कीर्तन व प्रवचनातून उपस्थितांना कीर्तनकारांनी प्रबोधन केले यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते तसेच भागवत सप्ताहाच्या समाप्तीनंतर गाव भोजनातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






