कंत्राटी नोकर भरतीचा काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करा.. लक्ष्य अकॉडमी व भगतसिंग फॅन क्लब कडून मुख्यमंत्र्याकडे मागणी.

441

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी – महाराष्ट्र शासनाने कंत्राटी नोकर पद भरतीचा काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात यावे म्हणून येथील लक्ष्य अकॉडमी स्पर्धा परीक्षा केंद्र व भगतसिंग फॅन क्लब अहेरी च्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शासनाने प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तिथे बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पध्दतीने कामे करून घेण्याचे शासनाने धोरण अवलंबविले आहे. त्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयान्वयें जवळपास 9 खासगी सेवा पुरवठादार कंपन्यांना कंत्राटी पद भरतीची मुभा देण्यात आलेली आहे. शासनाने काढलेले कंत्राटी पद भरतीचा शासन निर्णय स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांवर अन्याय करणारा असून या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये व समाजातील सर्व जागरूक घटकांमध्ये असंतोष पसरल आहे. त्यामुळे सदर शासन निर्णय तात्काळ रद्द करून येणाऱ्या अनेक भावी पीढीचे भविष्य सुरक्षित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्या केली आहे.

यावेळी भगतसिग फॅन्स क्लब चे अध्यक्ष अश्विन मडावी, लक्ष्य अकॉडमी ऍड पंकज दहागावकर, रोहिणी मडावी, सपना पवार, वनिता पवार, हिनल चालूरकर, अभिषेक गुरनुले, उदय सिडाम, नग्मा मडावी, अमिषा गट्टूवार, विजीता गोवर्धन,संगीता सडमेक, रविना गावडे, अश्विनी पोरतेट, रोहित पाले, प्रतिभा आलाम, सुनील आत्राम, सुनील मंडीगाम सह आदी स्पर्धा परीक्षेचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.