बळीराम काळे, जिवती
जिवती: (ता.प्र.) खासदार राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली असून,त्यांना जाणीवपूर्वक कट कारस्थान रचूले असून आणि सूडबुद्धीने फसविण्यात आल्याची भावना देशातील नागरिकांमध्ये आहे.
महत्वाच्या नेत्यांना तुरुंगात टाकून देशातील विरोधी पक्षांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याची ही खीली असल्याचे मानले जात आहे.त्याचा निषेध म्हणून जिवती तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील शेडमाके चौकात निषेध
नोंविण्यात आला.
याप्रसंगी गणपत आडे,नंदाताई मुसणे, डॉ.अंकुश गोतावळे,अशपाक शेख,विलास पवार,दिवाकर वेट्टी, जंगु कोटणाके,दत्ता गायकवाड,केशव भालेराव,दत्ता तोगरे,सुमनबाई शेळके,विष्णू रेड्डी,सुनील शेळके,केशव चव्हाण, सोमु सिडाम आदी उपस्थित होते.