Homeचंद्रपूरजिवतीचला तर मग क्षयरोगा विषयी जाणून घेऊया.. 24 मार्च जागतिक क्षयरोग...

चला तर मग क्षयरोगा विषयी जाणून घेऊया.. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन साजरा

बळीराम काळे,जिवती

जिवती: (ता.प्र.) जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती तालुक्यात या दिवशाचे औचित्य साधून क्षयरोगाबद्दल जाणून घेऊया या उपदेशात जिवती बाजारात जनजागृती मोहीम राबवित क्षयरोगांबद्दल पत्रिका वाटप करीत क्षयरोगावीषयी माहिती देत असताना,
क्षयरोग हा आजार हा प्राचीन रोग असून ,संसर्गजन्य रोग आहे. हा आजार मायकोबॅक्टरीयम टूबरक्यूलोसिस या जीवाणूंमुळे होतो. हा आजार हवेमार्फत पसरतो. क्षयरुग्णाच्या खोकल्यातून, शिंकण्यातून हे जिवाणू हवेत पसरतात आणि श्वसनामार्फत निरोगी माणसाच्या फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात.

मानवी शरीरात जिवाणू गेला म्हणजे क्षयरोग झाला असे नव्हे. जेव्हा व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा या जिवाणूंमुळे क्षयरोग हा आजार होऊ शकतो. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते उदा. एच आय व्ही बाधित व्यक्ती, मधुमेही व्यक्ती, कॅन्सर रुग्ण, फुफुसाचे इतर आजार असणारे, लहान बाळ व वयोवृद्ध व्यक्ती आणि क्षयरुग्णांच्या सहवासात असणाऱ्या व्यक्ती यांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते.

भारत देशाचा विचार केला तर दरवर्षी भारतामध्ये 40लाख क्षयरुग्ण निदान होतात.जगाच्या तुलनेत भारत देशामध्ये 25% क्षयरुग्ण आहेत. आजही दर अडीच मिनिटाला एक क्षयरुग्ण मृत्यू पावतो. क्षयरोग हा शरीरातील कोणत्याही भागाला (केस, दात व नख वगळता)होऊ शकतो. क्षयरोग हा आजार मुखत्वे फूफुसाला (80%) इतक्या प्रमाणात होतो.याला फूफुसाचा क्षयरोग म्हणतात. शरीरातील अन्य अवयवांना क्षयरोग झाला त्याला फुफुसाव्यतिरिक्त अवयवाचा क्षयरोग म्हंटला जातो.(यामध्ये गाठींचा क्षयरोग, मणक्यांच्या क्षयरोग, आतड्याच्या क्षयरोग, मेंदूच्या आवरणाचा क्षयरोग इ)

*फुफुसाच्या क्षयरोगाची लक्षणे*
१)दोन किंवा दोन आठवड्यापेक्षा जास्त काळाचा बेडकायुक्त खोकला
२)सायंकाळी येणारा हलका ताप
३)भूक मंदावणे
४)वजन घटणे
५)काही वेळा बेडक्यातून रक्त पडणे

वरील लक्षणे असणाऱ्या रुग्णांची बेडका नमुना व छातीचा क्ष किरण तपासणी करून घ्यावी. सदर तपासणी सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत केली जाते. तसेच NAAT नावाची अत्याधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध आहे.या तपासणी द्वारे क्षयरोगाचे निदान होतेच त्याबरोबर क्षयरोग नियमित औषधोपचार प्रणालीला दाद देणारा आहे की नाही हे सुद्धा कळत.

क्षयरोग निदान झालेनंतर क्षयरुग्णांला त्याच्या प्रकारानुसार नियमित क्षयरोग प्रतिरोधक औषधोपचार किंवा औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगाचा उपचार दिला जातो. क्षयरोग प्रतिरोधक औषधोपचार सर्व शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र ,आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत मोफत केला जातो. औषधोपचारासोबत क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजने अंतर्गत दरमहा 500 रु आहार भत्ता म्हणून दिला जातो. क्षयरोग औषधोपचार देण्यासाठी समाजातील कोणतीही व्यक्ती अथवा घरातील व्यक्ती उपचार सहायक बनू शकते.

क्षयरोगाचा औषधोपचार हा त्यांचा प्रकारानुसार 6महिने ते 20 महिन्यापर्यंत असतो. क्षयरुग्णांच्या सहवासित व्यक्तींना क्षयरोग होऊ नये म्हणूनही क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधोपचार दिला जातो. क्षयरुग्णांची व क्षयरुग्णांच्या सहवासितांची नियमित तपासणीही आरोग्य यंत्रणेकडून नियमित केली जाते. शिवाय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील तज्ञ कर्मचारी/अधिकारी ही क्षयरोग नियंत्रित करण्यासाठी कार्यरत आहेत.
मार्च 2012 पासून क्षयरोग हा आजार नोंदणीकृत आजार झाला असून भारत सरकारने 19 मार्च 2018रोजी राजपत्र प्रसिद्ध करून खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती शासकीय संस्थेला कळवणे बंधनकारक केलं आहे. क्षयरुग्णांची माहिती न कळवल्यास संबंधित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाला आर्थिक दंड व तुरुंगवास करण्याची तरदूत या राजपत्रात करण्यात आली आहे.खाजगी रुग्णालयात निदान झालेल्या क्षयरुग्णांना ही शासकीय यंत्रणेद्वारे सेवाही पुरवण्यात येतात.

भारत देश सन 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट आपल्या सन्मानीय पंतप्रधान महोदयांनी ठेवलं आहे. यासाठी विविध उपाययोजना राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले. या अभियायानंतर्गत निक्षय मित्र बनण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती,उदोजक, सामाजिक संस्था इत्यादी मंडळीना आवाहन करण्यात आले आहे .या अभियानाची सुरवात आपल्या देशाच्या आदरणीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते करण्यात आली आहे. निक्षय मित्राकडून क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना अन्नधान्य स्वरूपात 6 ते 12 महिन्यापर्यंत मदत करावी*.असे आवाहन करण्यात आले आहे.
क्षयरोग हया आजाराचे सनियंत्रण सार्वजनिक आरोग्य विभागाकडून “राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम;नावाने केला जाते . या कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांचे निदान, औषधोपचार व त्याचा नियमित पाठपुरवा मोफत केला जातो.
चला आपल्या देशाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी पाऊल पुढे ठेवूया .आणि आपल्या येणाऱ्या पिढीला क्षयरोग मुक्त हवा देऊया.

आणि एक जुटीने म्हणूया
होय, मी क्षयरोगाला संपवू शकतो !!
*Yes , we can stop TB !!

“चला क्षयरोग जाणून घेयुया, देशाला क्षयरोग मुक्त करूया” !!

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शासकीय दवाखान्याशी संपर्क करा.
*राष्ट्रीय क्षय रोग दुरीकरण कार्य क्रम टिबी युनिट जिवती*

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!