सिंदेवाही महिला काँग्रेसच्या वतीने ” सन्मान कर्तुत्वाचा ‘ कार्यक्रमाचे आयोजन

237

 

जगप्रसिद्ध ज्योती आमगे व अभिनेत्री प्रियंका ठाकूर यांची उपस्थिती

प्राचीन काळातील चाली- रीती, रूढी, परंपरा व चूल आणि मूल ही जाचक बंधने तोडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन समाजात नारीशक्ती कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या आदर्श कर्तुत्वान महिलांचा जागतिक महिला दिन पंधरवडा चे औचित्य साधून तालुका तथा शहर महिला काँग्रेस सिंदेवाही च्या वतीने “आदर नारी शक्तीचा, सन्मान कर्तुत्वाचा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ मार्च २०२३ रोजी सोमेश्वर महाराज मंदिर परिसर सिंदेवाही येथे करण्यात आले आहे.

आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार, अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, प्रमुख अतिथी म्हणून दिव्यांनी इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य शैलजा पाटील, डॉ. सुनीता लाकडे, माय छोटा स्कूल संचालिका नागपूर चेतना खंडाळे, माजी जि. प. सदस्या रूपा सुरपाम, माजी सरपंच मंदा चौके, माजी प. स. सदस्य मंगला हटवादे, महिला काँग्रेस संघटिका लता गेडाम, उपाध्यक्ष पंचायत गण शिवणी मंगला बोरकर ,शहराध्यक्ष नवरगाव चंद्रकला बोडणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

आयोजित कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या विशेष बाईक रॅलीने होणार असून संपूर्ण शहरातून भ्रमण करीत नारी शक्ती जिंदाबाद असा जनजागृती संदेश देत करण्यात येणार असून सोमेश्वर मंदिर परिसर येथे आयोजित या सन्मान कर्तुत्वाचा तालुक्यातील आशा वर्कर ,आरोग्य सेवेतील परिचारिका, नगरपंचायत सफाई महिला कर्मचारी, तालुक्यातील महिला सरपंच तसेच समाजातील इतर कर्तृत्ववान महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका महिला काँग्रेस कमिटी सिंदेवाही तथा शहर महिला काँग्रेस कमिटी शिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

बॉक्स -: ” आदर नारी शक्तीचा, सन्मान कर्तुत्वाचा ‘ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

सिंदेवाही तालुका महिला तथा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आदरणारी शक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा या कार्यक्रमास मुख्य आकर्षण म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वात कमी उंची असलेली महिला अशी नोंद असलेली नागपूर येथील ज्योती आमगे तर मराठी चित्रपटात तसेच नाटिकांमध्ये आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रियंका ठाकूर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.