Homeचंद्रपूरजिवतीप्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे जन आरोग्य समितीचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित..

प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे जन आरोग्य समितीचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित..

बळीराम  काळे, जिवती

जिवती : (ता.प्र.) माणिकगड पाहाडावरील जिवती तालुका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान व प्रकृति महिला विकास केंद्र द्वारा चंद्रपूर येथील प्रा.आ.केंद्र जिवती अंतर्गत येत असलेले उपकेंद्र टेकामांडवा, नगराळा, वणी (बु), केकेझरी, कुंभेझरी, धोंडा अर्जुनी, परमडोली, पुद्याल मोहदा व नोकेवाडा येथील जन आरोग्य समितीची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी प्रा.आ.केंद्र जिवतीचे वै.अधिकारी डॉ.अहिरकर, प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक निलेश देवतळे, जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक अक्षय देशमुख, तालुका समन्वयक संभाजी ढगे, मंगला घटे, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, सरपंच, आशा वर्कर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्राम आरोग्य दूत व समिती सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत डॉ.अहिरकर यांनी प्रस्ताविकेतून जन आरोग्य समितीमध्ये समुदायाचा सहभाग मिळवून समितीला बळकट करण्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले.
प्रमुख प्रशिक्षक म्हणून जिल्हा समन्वयक निलेश देवतळे यांनी आरोग्य म्हणजे काय, आरोग्यावर परिणाम करणारे विविध घटक, आरोग्याची काळजी घेणे, समिती तयार करण्या मागची गरज, समितीचा निधी रुग्णाच्या कल्याणासाठी खर्च व्हावा, समितीचा उद्देश इत्यादी विषयावर प्रशिक्षण दिले.
तर जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक अक्षय देशमुख यांनी जन आरोग्य समितीची रचना, भूमिका, जबाबदाऱ्या, कार्य, निधी, बैठका इत्यादी विषयावर प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणाचे संचालन व आभार संभाजी ढगे यांनी व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!