Homeनागपूरकाम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या आर्टस् अँण्ड कॉमर्स नाईट कॉलेजचा उपक्रम

काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या आर्टस् अँण्ड कॉमर्स नाईट कॉलेजचा उपक्रम

नागपूर:

दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक

आर्टस् अँण्ड कॉमर्स नाईट कॉलेज नागपूर व मनोहरराव कामडी महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचा” समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खेळातील सुप्त गुण असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला खेळात संधी मिळाली पाहिजे.विद्यार्थ्यांनी प्रगती करणे म्हणजे महाविद्यालयीन डिग्री मिळविणे होत नाही; तर खेळातून सुद्धा प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. खेळातून ऊर्जा मिळते. आनंद व प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग रा.तु.म नागपूर विद्यापीठ नागपूरचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी केले. ते यावेळी आर्टस् अँण्ड कॉमर्स नाईट कॉलेज नागपूर येथे ‘आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धे’च्या समारोपी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूरचे संचालक डॉ. जयंत गांगरेड्डीवार होते.
क्रीडा क्षेत्राला आपल्याकडे गौण स्थान दिल्या जाते. अभ्यासक्रमासोबत खेळालाही महत्त्वाचे स्थान आहे. खेळातून शारीरिक मानसिक विकास होतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये भाग घेणे फार गरजेचे आहे. असे विचार डॉ. जयंत गांगरेड्डीवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. महाविद्यालयातर्फे दरवर्षी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. पुढल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचे क्रीडा स्पर्धेचे आयोजन केल्या जाईल. असे मत आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. उषा साकुरे यांनी व्यक्त केले. या समारोपीय कार्यक्रमात प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेखा मनोहर यांनी केले. तर आभार डॉ. शिल्पा मेश्राम यांनी मानले.
प्रसंगी आर्टस् अँण्ड कॉमर्स नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. हिरालाल मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त करून कमवा आणि शिका या उक्तीचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. बावनकुळे व शिक्षकेतर कर्मचारी श्री नरेश डोईजड, वंदना कुत्तरमारे, आकाश सोमकुवर आणि मधुकर पडोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!