Homeचंद्रपूरजिवतीअखेर खूण प्रकरणी फरार आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या... फरार आरोपीला तब्बल...

अखेर खूण प्रकरणी फरार आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या… फरार आरोपीला तब्बल १० दिवसानंतर घेतले ताब्यात.

बळीराम काळे,जिवती

जिवती : ( तालुका प्रतिनिधी) जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील महिलेची निर्गुण हत्या केल्या घटना प्रकरणापासून फरार असलेला आरोपीस बेड्या टाकण्यास अखेर पोलीस प्रशासनास यश आले.किमान १० दिवसांनंतर यातील फरार आरोपीला सिंकनदराबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
पित्तिगुडा पोलीस स्टेशन हदितील मिरा गुरुदेव सहारे(२३)ही महिला आपली अपंग आई,बहीण यांच्यासोबत आपल्या नवऱ्याला घेऊन राहत होती. व काबडकष्ट करून आपल्या परिवाराचा उदारनिर्वाह करीत असता,मिरा गुरुदेव सहारे या महिलेचा मृतदेह २४ जानेवारी २०२३ ला गावालगतच्या जंगलात गावकऱ्यांना आढळून आला असता,याबाबत पोलीस कर्मचारी यांना माहिती कळवन्यात आली,माहिती मिळताच तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.घटनेचं गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी एक पथक तयार करून पुढील तपासाच्या सूचना दिल्या.
याप्रकरणी आरोपीवर ३०२ भांदवि सहकलम ३(२)(५) अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ सुधारणा २०१५ नुसार गुन्हा दाखल झाला असून,अंजाम घटनेपासून आरोपी फरार होता.
या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात सहा पथके गठित करण्यात आली.
त्या पथकाच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला असता,
तपासात गुन्ह्यातील फरार आरोपी सिकंदराबाद असल्याची माहिती मिळताच तात्काळ माहितीच्या आधारे पोलीस पथकांनी सिकंदराबाद गाठत फरार आरोपीला तब्बल १० दिवसांनंतर ताब्यात घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!