Homeचंद्रपूरजिवतीमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान संपन्न... आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उदघाटन..

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान संपन्न… आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उदघाटन..

बळीराम काळे, जिवती

जिवती : ( तालुका प्रतिनिधी) जिवती अंतर्गत तालुका व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती जिवती येथे,राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पा अंतर्गत,राणी हिराई रुरल मार्ट सेंद्रिय  निविष्ठा पशु खाद्य विक्री केंद्र ( कॉपशाप) उदघाटन कार्यक्रम,राजुरा विधानसभा शेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष भाऊ धोटे,यांच्या हस्ते करण्यात आले.

उदघाटनीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भागवत रेजीवाड सर संवर्ग गटविकास अधिकारी पंचायत समिती जिवती,तसेच काळे सर विस्तार अधिकारी सांख्यिकी प.स.जिवती,आणि तालुका अभियान व्यवस्थापक कक्षाचे अशांत चालखुरे सर ,मनोज किंनाके सर,BMIBCB मीनाक्षी उराडे मॅडम,(BCFL) प्रभाग समन्वयक सुरेश खोब्रागडे सर,रवींद्र वाढई सर,(cc.orgonic) पशु व्यवस्थापक सुनील राठोड,अमोल शिंदे,कृषी व्यवस्थापक शामुल जोंधळे,प्रभागासंग व्यवस्थापक वैशाली ब्रामने,प्रभाग संघाच्या अध्यक्षा मनीषाताई लांडगे,सचिव संगीता येळणे,समुदाय संसाधन व्यक्ती,नंदाताई मुसने,तसेच MCRP संगीताताई काळे,गीतांजलीताई रावणकोळे,राठोड ताई आणि उद्योग सखी प्रियंका काळे,प्रगती केदासे सर्व आणि ग्रामसंघाचे सदस्य व उत्पादक गटाचे सदस्य उपस्थित होते.तर राणी हिराई रुरल मार्ट सेंद्रिय निविष्ठा पशु खाद्य विक्री केंद्र ( कॉपशाप) उदेश हाच आहे की,जिवती तालुक्यातील सर्व उत्पादक गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची जास्तीत जास्त ग्रामीण लोकांपर्यंत प्रचार प्रसिद्धी व्हावी व मार्केटिंग आणि विक्री करणे हाच हेतू असला पाहिजे.करीता आजच्या उदघाटन प्रसंगी चांगला प्रतिसाद मिळाला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!