Homeनागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर 'कन्व्हेंशन सेंटर'चे लवकरच लोकार्पण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कन्व्हेंशन सेंटर’चे लवकरच लोकार्पण

नागपूर:

 

दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक

उत्तर नागपुरातील कामठी रोडलगत ग्रेन गोडाऊनचे जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कन्व्हेंशन सेंटर’ उभारण्याचे अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एक-दीड महिन्यात त्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.या ‘कन्व्हेंशन सेंटर’मुळे एक चांगले सभागृह तसेच विविध सुविधा असलेले केंद्र उपलब्ध होऊन उत्तर नागपुरात जनतेची सोय होणार आहे.

‘कन्व्हेंशन सेंटर’ची पाच मजली अतिशय देखणी इमारत तयार झाली आहे. यामध्ये बेसमेंट आणि तळमजल्यावर वाहनतळ सुविधा आहे. पहिला मजल्यावर भोजन कक्ष, स्वयंपाकघर, व्यापार केंद्र, संमेल सभागृह, माध्यम केंद्र, बैठक कक्ष, तीन अद्यापत कक्ष, बँक, रोकड खोली, एटीएम, लॉकर कक्ष, व्यवस्थापक कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर फाऊंडेशन ऑफिस, बैठक कक्ष, तीन कक्ष, उपाहारगृह आहे. तिसऱ्या मजल्यावर सार्वजनिक ग्रंथालय, ई-ग्रंथालय, बुद्धिस्ट स्टडिज डिव्हीजन, बैठक कक्ष, संचालक कक्ष आहे.

चौथ्या मजल्यावर सभागृह आणि बालकनी, प्रकाश कक्ष, ध्वनी कक्ष, रंगभूषा कक्ष, उपाहारगृह, कला दालन, श्रोता दालन, अतिथीगृह, निवास कक्ष आहे. तर पाचव्या मजल्यावर प्रशिक्षणगृह, नोंदणी कार्यालय, १० अतिथी कक्ष आहेत. या प्रकल्पाला सप्टेंबर २०१४ रोजी ११३.७४ कोटी मंजूर झाले. सामाजिक न्याय विभागामार्फेत कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात आले. तर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एनएमआरडीए)त्यांचे बांधकाम केले. आतापर्यंत या प्रकल्पावर ११२.६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

तिसऱ्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४० फूट उंच पुतळा बसवण्यात येणार आहे. तो पुतळा लवकरच बसण्यात येईल. तसेच इतर किरकोळ काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधातांना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी आज पाहणी दौऱ्यात दिल्या. ते म्हणाले, २०१४ ला निधी मंजूर झाला. करोना काळात कामाची गती संथ आली. पण, गेल्या वर्षभरात अतिशय वेगाने काम करण्यात आले. या प्रकल्पाचे लोकार्पण एक-दीड महिन्यात व्हावे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही सूर्यवंशी म्हणाले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!