Advertisements
चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत डोंगे हीची निवड अखिल भारतीय आंतरविद्यापिठीय वूशू स्पर्धेकरीता 48 या वजन गटात निवड झाली आहे.
Advertisements
पुजा ही मोडेल पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे शिक्षण घेत आहे. फेब्रुवारी मध्ये मोहाली, चंदीगड येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापिठीय वुशू स्पर्धेत ती आपल्या वजनगटात गोंडवाना विद्यापिठाचे नेतृत्त्व करेल. तीला पोलीस हवालदार प्रिती बोरकर आणि प्रशिक्षक विजय डोबाले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Advertisements
Advertisements