मनेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा आयोजन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचा उदघाटन

339

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक)

आल्लापल्ली :- दिनांक २६ जानेवारी २०२३ ला मन्नेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल(सर्कल)क्रिकेट सामन्यांचे आयोजन राजे धर्मराव हायस्कूल आल्लापल्ली च्या भव्य पटांगनावर करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मा.ना. श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे सहाउद्घाटक आल्लापल्ली ग्रा.प. चे सरपंच शंकर मेश्राम व ,तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गडमवार हे होते आणि कार्यक्रमाचे उद्घाटक ग्राम पंचायत चे उपसरपंच विनोद अकंनपल्लीवर हे होते . तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थिती श्री देवगडे साहेब उपवनरक्षक भामरागड डिवीज़न मा. योगेश शेरेकर साहेब, मा. चव्हाण साहेब, व राजे धर्मराव स्कुल आल्लापल्ली चे पर्यवेक्षक मा. करड़े सर उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति म्हणून श्री. सागर डेकाटे, दादाभाऊ ठाकरे, विकास उईके, दौलतभाऊ रामटेके आणि साई तुलसीगिरी यानी दर्शविली आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वरूप गावडे सर आणि कैलाशभाऊ धंधरे यांनी केले . या क्रिकेट सामन्याचे आयोजन कृणाल सल्लम, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष यांनी केले . या क्रिकेट सामन्याचे बक्शीस पुरस्कार मा. ना. श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज माजी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री यांच्या तर्फे देण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले व सामन्याचा श्री गणेशा केला ।