प्रितम गग्गुरी(उपसंपादक)
अहेरी- 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी येथील उपजिल्हा रुग्णालयात यूथच्या वतीने रुग्णाना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालयात डॉ. रविंद्र वाटोरे यांच्या शुभहस्ते रुग्णाना फळे व बिस्किट वितरित करण्यात आले.
याच प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय जीवनावर सुरेंद्र अलोणे यांनी प्रकाश टाकले.यावेळी राहुल गर्गम, प्रणय अलोणे, आशीष अलोणे, नभित ढोलगे, महेश मोहुर्ले, दिनेश मोहुर्ले, अविनाश गुरुनुले, अनिल मोहुर्ले, श्रीकांत गुरुनुले, अंकुश झाड़े, समीर शेख, आकाश मोड़कवार आदि व असंख्य युवक उपस्थित होते.