Homeचंद्रपूरजिवतीक्रांती स्तंभापासून रिपब्लिकन क्रांती लाँगमार्चला सुरुवात...

क्रांती स्तंभापासून रिपब्लिकन क्रांती लाँगमार्चला सुरुवात…

बळीराम काळे, जिवती

जिवती (तालुका प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत कठीण परस्थितीतून रात्रंदिवस श्रम करून स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या अधिकृत पक्ष, संघटनेत बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वे आणि लोकसत्ताक (रिपब्लिक) लोकशाही संविधानानुसार पक्ष संघटना चालविण्यात याव्यात. यासाठी १ जानेवारी २०२३ पासून क्रांती स्तंभ, भीमा कोरगावच्या पावन भूमी भीमा कोरेगाव येथून संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती व जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच अमरावती येथे १४ एप्रिल म्हाक्रांती परिषदचे आयोजन करण्यासाठी आवश्यक रिपब्लिकन क्रांती लाँगमार्चचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लाँगमार्चमध्ये बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन अशोक उमरे व त्यांचे सहकारी यांनी केले आहे.
साऱ्या विश्वाला आदर्शवत लोकशाही संविधान बहाल करणारे थोर युग पुरुष महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व परम पूज्य बोद्धीस्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’समता सैनिक दल आणि “दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया,या अधिकृत पक्ष,संघटनेत सदरील “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’क्रांती लाँगमार्चचे धम्मपद मॅनेस्ट्री पारनेर,अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर नगरे यांच्या अध्यक्षेतेखाली १९६४ मध्ये झालेल्या व सर्व जगात नोंद केलेल्या भूमिहीनाच्या सत्याग्रहाचे सत्याग्रही भंते कश्यप गडचांदुर चंद्रपूर, यांच्याहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
घटनात्मक लोकशाहीसाठी जीव की प्राण एक करणाऱ्या फसव्या लोकशाहीचा देखावा निर्माण करून बाबासाहेबांच्या विचारांची होत असलेली विवेलना व अवमाननेला पायबंद घालण्यासाठी आणि पक्ष घटनेनुसार वाटचाल करून एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन जनसमुदायानी रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चमध्ये आवर्जुन सहभागी व्हावे ! आणि सहकार्य करावे.
असे आवाहन अशोक उमरे यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!