Homeचंद्रपूरजिवतीदुचाकीस्वार यांचा माराईपाटण घाटात दुर्दैवी अपघात...सुदैवाने काही जिवीत हानी नाही...

दुचाकीस्वार यांचा माराईपाटण घाटात दुर्दैवी अपघात…सुदैवाने काही जिवीत हानी नाही…

बळीराम काळे, जिवती

जिवती : (ता.प्र.)माराईपाटण घाटात,आज दुपारी बुधवारला दिनांक २१/१२/२०२२ ला ठीक ३:३० वाजता दुचाकी स्वार खराब रस्त्यामुळे गोविंद चेवले नेहमी प्रमाणे आपल्या शेतीमधील भाजीपाला मार्केटला घेऊन जात असतांना त्यांचा माराईपाटण घाटात खरतड रस्त्यामुळे त्यांच तोल जाऊन दुचाकी सहित खाली पडले.परंतु सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही.नागरिकांचे म्हणंने आहे की,अगोदर माराईपाटण घाटातील रस्ता हा,खूपच खराब झाल्यामुळे प्रथमतः घाटातील रस्ता कॉट्रकटर यांनी रस्त्याचे काम त्वरित सुरू करून होणारा त्रास दूर करावा,अशी गावातील नागरिक व देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक भक्त गण,यांची सुदा मागणी आहे.
रस्त्याची अशी अवस्था आहे की, अत्यंत कठीण परिस्थितीत वाहन चालवावी लागते.झालेल्या सततच्या पाऊसामुळे रस्त्यावरील पूर्णपणे माती मुरूम वाहून गेली आहे.अती पावसामुळे घाटात नाली पडलेली आहे, व रस्त्यावर उघडी गिट्टी पडलेलि व इतरत्र विखुरलेली पाहवयास मिळत आहे. व रस्त्याच्या बाजूने नाली पडलेली दिसून येत आहे.
त्यामुळे दुचाकी वाहन धारकांना मार्ग काढण्याकरिता जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.रात्रीच्या वेळेस दुचाकी चालवणे,म्हणजे खूपच घातक बनले आहे.
पण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबतीत प्रशासनाणी लक्ष द्यावे व रस्त्याचे काम त्वरित चालू करून दुचाकी, फोर व्हिलर सेवा सुरळीत चालू होईल व परिसरातील विद्यार्थी व नागरिक यांची गैरसोय होणार नाही. असे नागरिकांचे म्हणने आहे. परिसरातील नागरिक रस्त्याच्या दुर्दशामुळे नाराजी व्यक्त करीत आहेत.त्यामुळे माराईपाटण रस्त्याचे काम त्वरित चालू करून, सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिवती यांनी कटाक्षाने लक्ष देऊन त्वरीत टेकामांडवा फाटा ते माराईपाटण रस्त्याचे काम सुरू करून,रस्त्याचे काम त्वरित सुरू करून होणारा त्रास दूर करावा अशी गावकरी मंडळी यांनी केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!