वाढदिवसानिमित्त विशेष लेख – धाडसी व कार्यकुशल नेतृत्व विजयभाऊ वडेट्टीवार…

677

मुन्ना तावाडे
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
सोशल मीडिया विभाग चंद्रपूर 

लोकांसाठी झटणारा, वंचितांचे दुःख आपले दुःख माननणारा, समता, बंधुता आणि न्यायाचा वसा घेतलेला धाडसी व कार्यक्षम नेता विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला आहे. नेहमी हसतमुख, आपुलकीने बोलणारा, दिलेला शब्द पाळणार असा बाणा आणि रंजल्या गांजल्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असे त्यांचे वैशिष्टय ! राज्याचे मंत्री असतांना त्यांचा आश्वासक असा मदतीचा हात महाराष्ट्रातील जनतेला नेहमीच लाभला आहे. सत्ता येते आणि जाते परंतु विजय वडेट्टीवार हे नेहमीच सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत प्रकाश किरणांप्रमाणे मदतीचा हात दीन दुबळ्यांना, वंचित आणि शोषितांना देत आहे. आज दिनांक १२ डिसेंबर रोजी विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्रातील जनतेकडून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन व लाख लाख शुभेच्छा .

कोणतेही संघटन हे ५ गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे संपर्क, त्यानंतर समर्पण, संवाद, सादगी आणि आपापसातील संबंध ! या ५ गोष्टी घेऊन जर तुम्ही पुढे गेलात तर संघटन मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सर्व ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त , दलित मित्रांना काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे करण्याचे कौशल्य विजय वडेट्टीवार यांच्यात आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला पुन्हा जनसामान्यांचे काँग्रेसचे सरकार देण्याचा ठाम निर्धार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपचे गड असलेले अनेक तालुके, ग्रामपंचायती, विधानसभा जागांवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याची विजयी कामगिरी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेकवेळा केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी कोरोना महामारीत राज्याचे मदत व पुनर्वसन विभाग ज्या कुशलतेने सांभाळले त्याची दखल देशभरातील संस्थांनी घेतली. खरे तर कोरोना संकट म्हणजे १०० वर्षानंतर जगावर आलेली सर्वात मोठी आपत्ती . या काळात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री म्हणून तसेच नैसर्गिक आपत्ती विभागाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांनी कौशल्याने पेलली . राज्यात कोविड सेंटर्सची उभारणी , अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदतीसाठी पाठपुरावा , चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्पांसाठी विजय वडेट्टीवार हे राज्यात सर्वात अग्रेसर होते.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्त क्षेत्रात तात्काळ दौरा केला व उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हातात आर्थिक मदत मिळेपर्यंत स्वतः लक्ष दिले. ओबीसी, भटक्या व विमुक्त जातींच्या प्रश्नांकडे, समस्या, मागण्यांकडे लक्ष देणारा मंत्री महाराष्ट्राला कधी मिळत नाही अशी तक्रार या समाजाची नेहमी असायची. मात्र २०१९ मध्ये विजय वडेट्टीवार यांनी बहुजन कल्याण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली व या विभागाला कधी नव्हे असा न्याय मिळून देण्यासाठी सत्तेतील प्रत्येक दिवस त्यांनी कष्ट घेतले. त्यांच्या या कष्टाला यश सुद्धा मिळाले . कधी नव्हे इतका निधी राज्यातील ओबीसी, भटक्या विमुक्त जातीला मिळू लागला. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना, सुविधा सुरु करण्यात आल्या. समाजाच्या प्रश्नांबत प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा व निर्णय होऊ लागले. याचे श्रेय हे फक्त आणि फक्त विजय वडेट्टीवार व त्यांच्या सोबत उभ्या असलेल्या ओबीसी भटक्या विमुक्त समाजाला द्यावे लागेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी भाजपने केलेले कटकारस्थान विजय वडेट्टीवार यांनी उध्वस्त केले. राज्यातील ओबीसी, भटक्या विमुक्त जातीतील लोकांना जागृत करून त्यांनी भाजपचा खरा ओबीसी विरोधी चेहरा उघड केला. भाजपने ओबीसींच्या बाजूने नीट भूमिका मांडली असती तर ओबीसींवर हि वेळ आली नसती हे आज राज्यातील ओबीसी समाजाला कळले आहे .

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ओबीसींच्या विचारांसाठी, ओबीसींच्या एकतेसाठी, हक्कांसाठी खूप मोठा लढा देण्याचे काम केले. ओबीसींचे आरक्षण टिकले पाहिजे, आज लढलो नाही तर भविष्यात ओबीसींचे नौकरी आणि शिक्षणातील आरक्षण देखील गमवावे लागेल हे ओबीसींना पटवून देण्याचे काम विजय वडेट्टीवार यांनी केले .
ओबीसी, आदिवासी, बारा बलुतेदार, मागास तळागाळातील जनतेला न्याय देणारे नेतृत्व म्हणून विजय वडेट्टीवार यांच्याकडे पूर्ण राज्य आशेने बघत आहे. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात संघर्ष करून राज्यातील ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त, वंचित घटक आपले हक्क प्राप्त करू शकतो हा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी या समाजात आज निर्माण केला आहे . अश्या या बुलंद नेतृत्वाला आज वाढदिवसानिमित्त माझ्या लाख लाख शुभेच्छा.