Homeचंद्रपूरभाडेतत्त्व करार वाहनांवर कल्याणकारी मंडळाकडून लाखोंची उधळण चंद्रपूर व गडचिरोली सहाय्यक...

भाडेतत्त्व करार वाहनांवर कल्याणकारी मंडळाकडून लाखोंची उधळण चंद्रपूर व गडचिरोली सहाय्यक कामगार आयुक्तालयातील प्रकार

मुन्ना तावाडे (मुख्य सल्लागार)

चंद्रपूर: कामगारांच्या न्याय हक्क व संरक्षणाकरिता राज्य शासन अखत्यारीत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्त कार्यालय व कामगार भवन मुंबई येथे कार्यान्वित आहे.तर ग्रामीण पातळीवरील कामगारांना न्याय ,हक्क व संरक्षण मिळण्याकरिता कामगार मंडळाची जिल्हा निहाय कार्यालय अस्तित्वात आहे. अशा पैकी एक असलेल्या चंद्रपूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर व सरकारी कामगार अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयात गेल्या वर्षानुवर्षांपासून अधिकाऱ्यांकरिता भाडेतत्त्व करारनाम्यावर खाजगी वाहनांचा वापर सुरू असून चंद्रपूर व गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध असताना, मर्जीतील लोकांचा व स्वतःचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने शहराबाहेरील पुरवठाधारकांची कोटेशन पद्धतीने वाहने लावून कल्याणकारी मंडळाची लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, औद्योगिक जिल्हा म्हणून सर्व दूर परिचित असलेला चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक कंपन्यांमुळे कामगारांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. अशातच कंपनी व्यवस्थापनांकडून कामगारांची होणारी पिळवणूक हक्क ,न्याय व संरक्षणाकरिता चंद्रपूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कार्यान्वित आहे. मात्र सदर कार्यालयाचा अजब कारभार सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला असून सदर कार्यालयात अधिकाऱ्यांकरीता भाडेतत्त्व करारनाम्यावर खाजगी वाहनांचा वापर सुरू आहे. भाडेतत्त्व करारावर घेण्यात आलेल्या वाहनांना प्रतिमाह 60 हजार रुपये इतकी मोठी रक्कम अदा करण्यात येत असल्याने वर्षाकाठी चक्क वाहनाची किंमत चंद्रपूर सहाय्यक कामगार आयुक्तालय मोजत असल्याची बाब गोपनीय चर्चेतून पुढे आली आहे. या संदर्भात अधिकची माहिती मिळवली असता आणखी मोठी धक्कादायक बाब पुढे आली असून लक्षावधी रुपयांच्या व्यवहाराची कुठलीही ही निविदा न काढता परस्पर मनमर्जीतील खाजगी वाहनधारक यांना भाडेतत्त्व करार प्रकारात समाविष्ट करून संगनमताने अधिकारी व मालक यांचे कडून चक्क शासनाच्या डोळ्यात उघडपणे धुळ झाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती हाती आली आहे. एवढे सर्व सुरू असतानाही ही गंभीर बाब वरिष्ठांच्या नजरेत का आली नाही? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासकीय कामाची कंत्राट देताना ई निविदा काढणे अनिवार्य असतानाही वर्षाकाठी चक्क वाहनाच्या किमती इतपत रक्कम अदा करून भाडे तत्व करारनामावर चालत असलेला हा अंदा धुंदी कारभार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून सोबतच सदर विभागाच्या अंतर्गत आणखी काही बऱ्याच मोठ्या भ्रष्टाचारांची लवकरच पोल खोल होणार असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील गोरगरीब कामगारांच्या न्याय हक्क व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली मंडळ व अखत्यारीत कार्यालय गोरगरीब गरजू व अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्याऐवजी शासनाच्या डोळ्यात धुळ झोकून भ्रष्टाचाराला खत पाणी घालत मलींदा लाटण्याचा सर्व प्रकार सहाय्यक कामगार आयुक्तालय चंद्रपूर व सरकारी कामगार अधिकारी गडचिरोली कार्यालयात उघडपणे सुरू आहे. सध्या सदर सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर कार्यालयात नागपूर येथील एम एच 49 ए टी 64 79 तर गडचिरोली येथील कार्यालयात चंद्रपूर येथील एमएच 49 ए टी 6849 वाहने कर्मचाऱ्यांच्या अपडाऊन करिता भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून सदर वाहने भाडेतत्त्वावर घेतल्यापासून तर याची लॉक बुक एन्ट्री वरिष्ठांनी तथा या संपूर्ण प्रकाराची तपासणी त्रयस्थ जिल्हा प्रशसनाच्यावतीने आर टी ओ विभागातील अधिकारीकडून करून घोळ करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी वरील दोन्ही कार्यालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी करण्यात येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!