Homeचंद्रपूरकार्तिक पौर्णिमा महोत्सव-2022 श्री.हनुमान वारकरी भजन मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर येथे...

कार्तिक पौर्णिमा महोत्सव-2022 श्री.हनुमान वारकरी भजन मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर येथे संपन्न…

श्याम म्हाशाखेत्री(जिल्हा संपादक, चंद्रपुर)

चंद्रपुर: दरवर्षी प्रमाणे यंदाही हनुमान वारकरी भजन मंडळ यांचे तर्फे काकड आरती एकादशी निमित्त दिनांक.9.10.2022 ते 9.11.2022 पर्यंत काकड आरती एकादशी चा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात रोज भजन, कीर्तन, प्रवचन करण्यात आले होते. शेवटचा काकड आरती निरोप समारंभ म्हणजे विठ्ठलाची महापूजा करून भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे सिरोंचा तालुक्यातील पारंपारिक आदिवासी नृत्य हे होते आणि विठ्ठलाची भव्य दिव्य मूर्ती ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या शोभायात्रेत सहभागी माजी गृहराज्यमंत्री श्री.हंसराज जी अहिर, ओबीसी शहर अध्यक्ष श्री विनोद शेरकी, राजेंद्र खांडेकर, माजी नगरसेवक नंदु नागरकर, माजी नगरसेविका सौ.सीमाताई रामेडवार, माजी नगरसेविका सौ.संगीताताई खांडेकर यांची उपस्थिती होती.

ही रथ यात्रा जोडदेवुळ हनुमान मंदिर इथून पुढे गांधी चौक मार्गे परत मंदिरात शेवट करण्यात आला. मोठया भक्तिभावाने वॉर्डातील महिला व पुरुष या रथ यात्रेत सहभागी झाले होते. या रथ यात्रेला अथक परिश्रम घेणारे काकड आरती एकादशी आयोजन समितीचे अध्यक्ष श्री.तुळशीराम आंबटकर, उपाध्यक्ष श्री.अशोक नवघडे, कोषाध्यक्ष श्री.शशिकांत नागापुरे, कार्याध्यक्ष श्री.सुधाकर बुटले, सचिव श्री.संतोष वाकुडकर, सहसचिव श्री.राहुल पाल, संजय बनकर आणि आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व वॉर्डातील महिला पुरुष यांनी अथक परिश्रम घेत एक महिन्याचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!