Homeमुंबईआईने केली दोन मुलांची हत्या ! नंतर स्वत:ही हाताची नस कापून केला...

आईने केली दोन मुलांची हत्या ! नंतर स्वत:ही हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई : घणसोली गावात राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या मुलांची हत्या करून स्वतःही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
संबंधित जखमी महिलेवर नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, दोन्ही मृत मुले अल्पवयीन आहेत. या घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलांच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. घटनेचा रबाळे पोलीस अधिक तपास करत आहे.
टिपू वेणाराम गुर्जर (वय ४) आणि राहुल वेणाराम गुर्जर (वय १), अशी मृत मुलांची नावे आहेत. तर स्वतःच्या मुलांची हत्या करणाऱ्या आईचे नाव पुष्पा गुर्जर आहे. रबाळे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार घणसोली गावात रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. एका महिलेने स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर आईने स्वतःही हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

आठ दिवसांपूर्वी साजरा केला होता वाढदिवस

मृत राहुल गुर्जर या एक वर्षाच्या मुलाचा पहिला वाढदिवस आठ दिवसांपूर्वी साजरा केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मृत मुलांचे वडील घणसोली परिसरात आईसक्रीम पार्सलचा व्यवसाय करीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी वेणाराम गुर्जर याला ताब्यात घेतले असून, रबाळे पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक बी. एन. औटी अधिक तपास करीत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!