Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटेंना पुन्हा धक्का... नाराज रामचंद्र कुरवटकरांच्या भुमिकेने संकट...

गोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटेंना पुन्हा धक्का… नाराज रामचंद्र कुरवटकरांच्या भुमिकेने संकट वाढले

गोंडपिपरी- काँग्रेसचे जेष्ट नेते सुरेश चौधरी यांचे सूपूत्र राहूल चौधरी यांनी भाजपत प्रवेश केला.काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजीवसिंह चंदेल यांनी आमदार धोटेंवर निशाना साधत ते मोजक्याच कार्यकर्त्यांना महत्व देत असल्याचे सांगत घरचा आहेर दिला होता.आता पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा काँग्रेसचे नेते रामचंद्र कुरवटकर यांनीही आमदार सुभाष धोटेंच्या नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना जास्त महत्व देत असल्याच्या भुमिकेवरून तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.आता बहूसंख्येने असलेल्या समाजाची मोटबांधणी सूरू करून त्यांनी वेगळी भूमीका घेतली आहे.काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गोंडपिपरीत गेल्या दिवसात एकापाठोपाठ एक धक्कांनी पक्षांतील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे.आमदार सुभाष धोटेंना हे मोठेच धक्के मानल्या जात आहे.विधानसभा निवडणुकांची रंगीन तालीम असणाऱ्या जि.प. ,पं.स. निवडणुका येत्या काळात होऊ घातल्या आहेत.अशात काँग्रेस पक्षाला चांगला फटका बसू शकतो असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
राजुरा विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता.अशात शेतकरी संघटनेचे नेते अँड.वामनराव चटप यांनी काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडला होता.यानंतर अँड.संजय धोटे यांनी विजयश्री मिळवीत भाजपला या क्षेत्रात ओपनींग करून दिली होती.
आमदार सुभाष धोटे हे आता दुसऱ्यांदा या क्षेत्राचे नेतृत्व करीत आहेत.मागील निवडणूकीत ते अतीशय कमी मताधिक्याने विजयी झाले होते.अँड वामनराव चटप यांनी मतमोजणीच्या तेवीसाव्या फेरीपर्यत आघाडी कायम ठेवली.पण शेवटच्या फेरीत त्यांचा पराभव झाला होता.
आमदार सुभाष धोटे यांच्या विजयात गोंडपिपरी तालूक्याचे मोठे योगदान राहिले.तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने पक्षासाठी काम करीत धोटेंना विजयी केले.पण आता काँग्रेसचे नेते उघडपणे आमदार धोटेंच्या भुमिकेचा विरोध करू लागले आहेत.
राहुल चौधरी,राजीव चंदेल यांच्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ट नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर यांनीही आमदार सुभाष धोटेंच्या भुमिकेवरून तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकत वाढतेय असा अपप्रचार हेतुपुरसूपरपणे पसरविण्यात येत आहे.पण हा निवळ भ्रम आहे.वारंवार होत असलेल्या उपेक्षेने आता रामचंद्र कुरवटकर यांनी भुमिका घेतली आहे.
गेल्या दिवसात गोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटे यांना त्यांचेच कार्यकर्ते चांगलेच धक्के देत आहेत.
रामचंद्र कुरवटकर हे काँग्रेस चे गोंडपिपरी तालुक्यातील जेष्ट नेते आहेत.ते पंचायत समितीचे माजी उपसभापती राहिले आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!