Homeचंद्रपूरजिवतीतालुक्यात ग्रापंचायतींच्या निवडणूका जाहीर होताच ग्रामीण भागात सर्वत्र धावपळ कोन होनार...

तालुक्यात ग्रापंचायतींच्या निवडणूका जाहीर होताच ग्रामीण भागात सर्वत्र धावपळ कोन होनार सरपंचपदाचा मानकरी यासाठी लागली चुरस

बळीराम काळे,जिवती

जिवती (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील २९ ग्राम पंचायतित सार्वत्रिक निडणुकी कार्यक्रम जाहीर झाला असून,१३ ॲक्टोबर २०२२ ला मतदान होणार आहे.
तरी राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशनुसार जानेवारी २०२१ ते २०२२ या कालावधित मुदत संपुष्टात आलेल्या व जुन २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधित मुदत संपुष्टात येणाऱ्या तसेच नव्याने प्रस्थापित ग्राम पंचायतीच्या सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडनुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.त्यामुळे सर्वत्र गांवामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जाहीर कार्यक्रमानुसार जिवती तालुक्यातील माराईपाटण,येलापुर, कोदेपुर, टेकामंडवा, चिखली(खू.)भारी, शेडवाही (भारी)सोरेकासा, आंभेझरी,राहापल्ली (खू.)भोक्सापुर,येरमियेसापुर, शेणगाव,असापुर,मरकागोंदी,पिट्टीगुडा नंबर १,पिट्टीगुडा नंबर २,मरकलमेटा, धोंडार्जूनी, गुडशेला,केकेझरी, नोकेवाडा,दंपुरमोहदा,देवलागुडा,पाटण,चिखली(बू)खडकीहिरापुर, पुनागुडा इत्यादी २९ ग्राम पंचायतीत सदस्यपदासह थेट सरपंचपदाकरीता १३ ॲक्टोबर ला मतदान होणार असून १४ ॲक्टोबरला मतमोजणी
होणार आहे.
:- २१ ते २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत नामंकन भरता येणार आहे.२८ सप्टेंबरला नामांकनाची छाननी करण्यात येईल,३० सप्टेंबर २०२२ ला दुपारी ३:०० वाजेर्यंत नामांकान माघार व त्याच दिवशी निवडणुक चिन्ह वाटप तसेच अंतीमरीत्या निवडणुक वाढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.१३ ॲक्टोबर २०२२ ला मतदान होइल.तर १४ ॲक्टोबर २०२२ या दिवशी मतमोजणी करुन निकाल जाहीर करण्यात येईल.
राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुका असलेल्या ग्राम पंचायतीमध्ये ७ सप्टेंबर २०२२ पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अमलात राहील, याची सर्वांनी नोंद घेण्याचे आवाहन तहसीलदार जिवती यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!