Homeचंद्रपूररामदास कदम यांच्या वक्तव्याचा चंद्रपुरात शिवसेनेतर्फे भव्य निषेध आंदोलन...

रामदास कदम यांच्या वक्तव्याचा चंद्रपुरात शिवसेनेतर्फे भव्य निषेध आंदोलन…

प्रलय म्हाशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपुर: राजकारणात वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप होत राहतात प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता आपली बाजू जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी विविध प्रकारचे युक्तिवादही करतो परंतु संसदीय राजकारणाची पातळी खालावली आहे आणि काही लोकांनी तर जणू यासाठीची सुपारीच घेतली आहे.

आरोप प्रत्यारोप करताना किंवा वादविवाद करताना ते मुद्द्यांवर असावे ते ध्येय धोरणावर असावेत नवे ते तसेच आजपर्यंत होत होते परंतु कौटुंबिक पातळीवर घसरणे गलिच्छ पातळीवर येऊन बोलणे हा काही लोकांचा धंदा झाला आहे.

ज्या रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद दिली आणि विधान परिषदेतून पर्यावरण मंत्री पद दिले. रामदास कदम यांच्या मुलाला आमदार केले. मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी पोटच्या पोरासारखी काळजी घेतली.
त्या रामदास कदम यांनी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं.. ही हिम्मत दाखवणं. ही विकृती आहे हा सत्तेचा माज आहे.

रामदास कदम सारखा माणूस शिवरायांचा मावळा किंवा शिवसैनिक तर दूरच परंतु तो कुणाचाही मुलगा किंवा भाऊ म्हणून घेण्याच्या ही लायकीचा असू शकत नाही.

अशा माणसाला शिवसेना राज्यात फिरू देणार नाही असा निश्चय करत शेकडो शिवसैनिकांनी चंद्रपुरात गांधी चौक येथे आज त्यांच्या फोटोला जोडा मारून निदर्शने करत निषेध केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.संदिप भाऊ गिऱ्हे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!