Homeगोंडपीपरीयशासाठी मेहनतीशिवाय पर्यायच नाही सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे

यशासाठी मेहनतीशिवाय पर्यायच नाही सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे

गोंडपिपरी:-
स्पर्धा परिक्षेत अलीकडे कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे.
पण कितीही स्पर्धा असली तरी हार न मानणारे,प्रचंड आत्मविश्वासाने परिश्रम करणारे यशश्वी होतातच.यामूळ अधिक ताकतीन स्वतवर विश्वास ठेऊन पुर्ण तयारीनिशी कामाला लागा,यश तुमच्या पदरात पडेल,असे मत चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मांडले.
निसर्ग सखा संस्थेच्या वतीन गोंडपिपरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.गोंडपिपरीचे तहसिलदार के.डी.मेश्राम,बिडीओ गजानन मुंडकर,प्रभावी वक्ते बळीराज निकोडे,युवा कार्यकर्ता सुरज माडुरवार,जितेश कुळमेथे,निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे,अमीर खान अदि मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
ग्रामीण भागात स्पर्धा परिक्षांची तयारी करणाÚया तरूणांची संख्या कमाचीची वाढू लागलीय,पण अनेक विद्याथ्र्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने त्याचा फटका त्यांना बसतो.अशावेळी केंद्रिय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करून सहायक जिल्हाधिकारी पदी विराजमान झालेले युवा कर्तव्यदक्ष अधिकारी रोहन घुगे यांच्या अनुभवाचा फायदा या दुर्गम भागातील विद्याथ्र्यांना व्हावा यासाठी निसर्ग सखा संस्थेने पुढाकार घेतला.
अन गोंडपिपरीत त्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजीत केला.याप्रसंगी त्यांनी विविध मुदयावर बोट ठेवीत आपले अनुभव कथन केले.तहसिलदार मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनातून तरूणाईंना अभ्यास करण्याचा संदेश दिला.बिडीओ गजानन मुंडकर यांनी प्रशासनातून सामान्यांसाठी काम करता यावी यासाठी
मोठया पॅकेजची नौकरी सोडून स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून प्रशासनाची नौकरी स्विकारल्याचे सांगितले.सहायक जिल्हाधिकारी घुगे आणी आपण एकाच शाळेचे विद्यार्थी असल्याची आठवण त्यांनी करून दिली.याप्रसंगी बळीराज निकोडे,सुरज माडूरवार यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर मार्गदर्शन शिबीराचे निमीत्ताने भाष्कर कुंदावार,अनिकेत दुर्गे,सर्पमित्र सागर झाडे,आदर्श माष्टे,पंकज नागापूरे,मयुर खरबनकार यांचा सत्कार करण्यात आला.राहूल येरमे,आशिष दुर्गे,अभी आखाडे,अश्वीनी वांढरे,चैताली खंडालकर,प्रिया पारखी,शितल नागापूरे,यांनी परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!