Home चंद्रपूर गोंडपिंपरी भरधाव वेगाने येणारा ट्रक सरळ घरात घुसला… गोंडपिपरी येथील घटना; लाखोंचे नुकसान…

भरधाव वेगाने येणारा ट्रक सरळ घरात घुसला… गोंडपिपरी येथील घटना; लाखोंचे नुकसान…

2126

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी :- चंद्रपूर मार्गे गोंडपीपरी वरून सुरजागडला जाणारा MH 34 BZ 1092 क्रमांकाचा पंकज जैन यांच्या मालकीचा ट्रक गोंडपिपरी येथील बंडू बळीराम बांगरे यांच्या घरात घुसल्याची घटना दि.(१६) शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.

या भीषण अपघातात घराची 5 लाखाची नुकसान झाली असून रस्त्यावरच्या एका दुचाकीचा चुराडा झाला. घटनास्थळी ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय पटले परिस्थिती हाताळत असून एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात असून ट्रक काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

Don`t copy text!