श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)
चंद्रपूर: प्रशासनाने खूप मोठा निधी खर्च करून गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्याकरिता व तपास यंत्रणेला सोयीचे व्हावे याकरिता जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले होते. दारूबंदी लच्या काळापासून पठाणपुरा गेटच्या बाहेर व आत असे तीन ते चार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु आता तो प्रशासनाचा तिसरा डोळा बंद पडला की काय हाच प्रश्न पडतो सर्वसामान्य लोकांना पडतो आहे.
कारण या तिसऱ्या डोळ्यातून परिसरातील गुन्हेगारी नाहीशी व्हायची सोडून वाढलेली दिसत आहे. पठाणपुरा गेट मार्ग हा तस्करांना तस्करी करण्याकरिता एक उत्तम मार्ग आहे. त्या मार्गाने गो तस्करी होत आहे. त्यातच दारू तस्करी खुलेआम सुरू आहे. सोबतच गो तस्कर या मार्गाने सरळ आंध्रप्रदेश मध्ये जनावरांना कत्तली करिता नेत असतात.
दोन दिवसापूर्वी याच मार्गाने इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चे जिल्हा संपादक यांनी एका मिनिडोर चा पाठलाग केला असता. त्या गाडी मध्ये जनावरांना कत्तली करिता नेताना दिसले. याच मार्गाने म्हणजे पठाणपुरा गेट ते राजनगर, सहारा पार्क या रोड लगत असलेल्या काही दुकानामध्ये खुलेआम सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रीमुळे कॉलनी मधल्या लोकांना ये जा करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शहराच्या बाहेर असल्यामुळे या रोडवर सकाळ पासून तर रात्रीचे अकरा वाजेपर्यंत दारूड्याची भर रोडवर मैफिल भरत असते. अश्यातच दारूच्या नशेत राज नगर सहारा पार्क या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू शकते. याला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे की नाही याची शहानिशा करावी. शहर पोलीस स्टेशन यांनी दारुविक्रीला आलेले उधाण थांबवावे आणि मार्गावर पोलीस गस्त वाढवावी अशी नागरिकांनी मागणी आहे.






