Homeचंद्रपूरसियोन बहुउद्देशिय समाज विकास संस्थेतर्फे गरजू लोकांना एक हात मदतीचा..

सियोन बहुउद्देशिय समाज विकास संस्थेतर्फे गरजू लोकांना एक हात मदतीचा..

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)

चंद्रपुर: सियोण बहुउद्देशीय समाज विकास संस्थेतर्फे शासकीय रुग्णालय,चंद्रपुर परिसरात बाहेरून येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय योग्य पद्धतीने होत नाही आणि बाहेरील जेवणाचा खर्च त्यांना झेपत नसल्यामुळे नातेवाईकांना अनेक अडचणी येतात.

ही बाब लक्षात घेऊन सीयोन बहुउदेशिय समाज विकास संस्थेचे अध्यक्ष श्री.मिलिंद सोनकुसरे, उपाध्यक्ष श्री.वैभव मोडकवार, सचिव श्री.चंद्रशेखर पडगेलवार यांनी सामाजिक दायित्व जोपासत शासकीय रुग्णालय परिसरात गेल्या ताळेबंदी पासून अन्नदान हा उपक्रम सुरू केला आहे. ज्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना एक दिवस का होईना परंतु त्याच्या पोटाची भूक मिटेल आणि त्यांचा जेवणाचा खर्च वाचेल या उद्देशाने या संस्थेमार्फत हा उपक्रम सुरू आहे..

समाज हित जोपासणारे ह्या जगात खूप कमी लोक असतात. माणूस मोठा होतो तो आपल्या चांगल्या कर्तुत्वाने. दगडा मधला देव पुजण्यापेक्षा माणसात ला देव शोधण्याचे काम सीयोन या बहुउद्देशीय समाज विकास संस्थेतर्फे होत आहे ही अभिमानाची बाब आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या उत्साहात अन्नदान करीत होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!