Homeचंद्रपूरशूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्थाकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्थाकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी) प्रतिनीधी:-

दिवंगत श्री मारोतीजी येग्गेवार यांचा संकल्पनेतून शिक्षक दिनाचा औचित्य साधून शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्थाकडून भंगाराम तळोधीत दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक तसेच 10वी आणि 12 वीत सर्वाधिक गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.

दिवंगत श्री मारोतीजी येग्गेवार यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेला सत्कार्य त्यांचानंतरही संस्थाकडून सुरू आहे.शिक्षक हे समाजाचा आरसा आहेत.देशाचा भविष्यात त्यांचा अमोल वाटा आहे.विद्यार्थांचा उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचाहातून उत्तमोत्तम कार्य घडत राहावे यासाठी एक प्रेरणा म्हणून येग्गेवार सरांनी सुरू केलेलं कार्य सदा सर्वांचा स्मरणात राहील.यावर्षी श्री उमाकांत तिवाडे या सरांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून पूरस्कृत करण्यात आले.

या कार्यक्रमाला श्री अमर बोडलावार माजीजि.प.सदस्य चंद्रपूर, सौ वैष्णवी अमर बोडलावार माजी जि.प.सदस्या चंद्रपूर, सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार भंगाराम तळोधीचे सरपंच ,श्रीमती अर्चनाताई येग्गेवार माजी ग्राम पंचायत सदस्या,श्री भानेश कंकलवार शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष, श्री सूनिलभाऊ रामगोनवार तं मू स अध्यक्ष,श्री शिवप्रसाद बोडलावार माजी ग्राम पंचायत सदस्य,श्री लक्ष्मण येग्गेवार माजी तंमूस अध्यक्ष,श्री रामदास येग्गेवार, राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री उराडे सर, शिक्षक वृंद, प्राध्यापक,इतर कर्मचारी तसेच विद्यार्थांची उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!