Homeचंद्रपूरओबीसी योद्धा उतरला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच्या मैदानात... प्रा.अनिल डहाके सह...

ओबीसी योद्धा उतरला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच्या मैदानात… प्रा.अनिल डहाके सह सेक्युलर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी केला निवडणूक अर्ज दाखल…

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपुर: येत्या ०४ सप्टेंबर २०२२ ला गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून अनेकांची नजर या निवडणुकीवर आहे. परंतू या निवडणुकीत एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे ते म्हणजे चंद्रपुरातील ओबीसी योद्धे म्हणून ओळखले जाणारे प्रा.अनिल डहाके.

प्रा. अनिल डहाके हे चंद्रपुरातील नामवंत अशा भवानजीभाई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक आहेत. महाविद्यालय शिक्षण घेत असताना अनेक वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेचे ते विजेते असून. प्रा. डहाके उत्तम वक्ते आहेत.

अनेक ठिकाणी त्यांची वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन, व्याख्याने झालेली आहेत. गेल्या २६ नोव्हेंबर २०१९ ला चंद्रपुरात ऐतिहासिक ओबीसी मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाच्या नियोजनात प्रा.अनिल डहाके यांनी सायकल रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण चंद्रपूर जिल्हात मोर्चा संदर्भात जनजागृती केली.

त्या मेहनतीचे फळ ओबीसीच्या मोर्चात आपल्याला बघायला मिळाले. एवढंच नाही तर ओबीसी विद्यार्थ्यांना दर जिल्ह्यात 2 वसतिगृह द्या अन्यथा तात्पुरती सोय म्हणून त्यांना स्वाधार योजना लागू करा या संदर्भात प्रा. डहाके यांनी प्रचंड मेहनत घेत आहेत. महाविद्यालय जीवनात वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत प्रतिस्पर्धकांना घाम फोडणाऱ्या या व्यक्तीने निवडणूकित अर्ज दाखल केल्याने विरोधी पॅनल च्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडला आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर निवडणूकिमध्ये सेक्युलर परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रा.अनिल डहाके यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!