Homeचंद्रपूरसोनिया गांधी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा जिल्हा...

सोनिया गांधी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा जिल्हा महिला काँग्रेसने केला निषेध

चंद्रपूर: अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीण च्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात आंदोलन करण्यात आले.

काल काँग्रेस चे गटनेते अधीर रंजन चौधरी यांचा निषेध करत असतांना स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी केली तेव्हा, खासदार रमा देवी यांच्या कडे सोनिया गांधी गेल्या आणि माझं नाव का घेत आहेत?? रंजन यांनी माफी मागितली असे सांगितले. तेव्हा इराणी सोनिया गांधी उभ्या असलेल्या बेंच जवळ गेल्या व सोनिया गांधी यांच्या शी हुज्जत घालायला लागल्या या सर्व घटनाक्रमाचा निषेध करण्यासाठी जिल्हा महिला काँग्रेस कडून जिल्हाधिकारी कार्यालया समोर स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांची माफी मागावी यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी इराणी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या फोटोला उपस्थित महिलांनी चप्पल मारून निषेध व्यक्त केला.

“काल संसदे मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आमच्या नेत्या सोनिया जी गांधी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले, त्यांच्या शी वाद घालून ज्या प्रमाणे लांडगे झुंडिने हल्ला करतात त्याप्रमाणे त्यांना गराडा घालून विचित्र देहबोली वापरून त्यांच्याशी वाद घातला. त्यांच्या अंगावर धाऊन गेल्यासारखे केले, एका ७५ वर्षीय महिलेचा अशा पद्धतीने अपमान केला. स्मृती इराणी ला जर महिलांचा एवढा कळवळा आहे तर, हाथरस बलात्कार कांड झाले, उन्नाव मध्ये त्यांच्या पक्षातील आमदाराने बलात्कार केला तेव्हा, संसदेत पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधी बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले तेव्हा, लखीमपूर मध्ये महिला ची साडी सोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा या इराणी कुठे होत्या?? देशात महागाई ने सर्वसामान्य महिला त्रस्त आहे त्यावर इराणी का नाही बोलत?? खरे तर हे आहे की, इराणी ची मुलगी गोव्या मध्ये अनधिकृत बार चालवते हे प्रकरण बाहेर आल्यानेच चवताळलेल्या सिलिंडरिका यांना कसे वागावे याचे भान उरले नाहीयेय. म्हणून त्यांचे पक्षप्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी आणि स्वतः इराणी यांनी समस्त भारतीय महिलांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन महिला काँग्रेस करेल असा इशारा जिल्हाध्यक्षा ठेमस्कर यांनी यावेळी दिला.

या वेळी सिनिअर उपाध्यक्षा शितल कातकर,उपाध्यक्षा हर्षा चांदेकर,  मंगला शिवरकर, सिंदेवाही तालुका अध्यक्षा सीमा सहारे, गोंडपीपरी तालुका अध्यक्ष रेखा रामटेके, बल्लारपुर तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद, नेहा मेश्राम, संगीता मित्तल, रिता जयस्वाल, मेहेक सय्यद, लता गेडाम, पदमा गड्डमवार, भाग्यश्री सिंग, पूनम वर्मा, पुष्पा नक्षणे,  उषा रॉय, भानू रॉय, रिता रॉय, शालू दास, काजोल बिस्वास,कनिका मवाली, लक्ष्मी सिद्धा, संदीपा चक्रवर्ती, सुनंदा संग्रामे, माला चक्रवर्ती, समिस्ता फारुकी, किरण वानखेडे,सरस्वती वैकुंडे, विमल ठाकरे, वैशाली जोशी, सीमा धुर्वे, मीनाक्षी गुजरकर, सुरेखा चिडे, खुशी शेख,मुन्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, सुरेश श्रीवास्तव, तुकेश वानाडे, प्रकाश देशभ्रतार यांच्या सह बहूसंख्य महिलांची उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!