Homeचंद्रपूरभीम आर्मी(भारत एकता मिशन) जिल्हा चंद्रपूरने दिली सी.सी.आर कंपनीला एक दिवसाची मुदत...

भीम आर्मी(भारत एकता मिशन) जिल्हा चंद्रपूरने दिली सी.सी.आर कंपनीला एक दिवसाची मुदत…

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपुर: सी.सी.आर. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या वाहन चालक बांधवावर कंपनीने मागील चार महिन्या पासून वेतन न दिल्यामुळे उपासमारीची वेळ आणली आहे. सर्व प्रयत्ना अंती भीम आर्मी (भारत एकता मिशन) या सामाजिक संघटने कडूनच आपल्यास न्याय भेटल या अपेक्षेने सर्व ड्रायवर बांधवानी चंद्रपूर जिल्हा उपप्रमुख सुरज भाऊ उपरे यांना भेट दिली व न्याय मिळवून देण्याची मांगणी केली, विषयांचे गांभीर्य लक्षात घेता सुरज भाऊ उपरे यांनि जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांच्याशी सल्ला मस्सलत करून व सर्व कायदेशीर बाबींचा ऍड. प्रशांत भाऊ रामटेके महानगर प्रमुख यांच्या कडून मार्गदर्शन घेऊन तहसीलदार व पोलीस निरीक्षक राजुरा तसेच सी. सी. आर. कंपनी च्या कार्यालयात आज दिनांक 28/07/2022 रोजी निवेदन देण्यात आले व इशारा देण्यात आला कि दिनांक 29/07/2022 पर्यंत ड्रायवर बांधवांचे 4 महिन्याचे थकीत वेतन व संपूर्ण मांगण्या जर पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर दिनांक 30/07/2022 ला सर्व ड्रायवर बांधव सकाळी 12:10 मिनिटाने गौरी डीप गेट समोर धरणे देतील आणि या नंतरही जर मांगण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कायदेशीररित्या आमरण उपोषण केल्या जाईल तसेच नवीन कामगारांना कामावर घेऊ देणार नाहीत व सर्व काम बंद पाडल्या जाईल असे भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी कळविले.
प्रासांगिक जिल्हा उप प्रमुख सुरज भाऊ उपरे, महानगर प्रमुख ऍड. प्रशान्त भाऊ रामटेके,गोंडपिपरी तालुका प्रमुख शुभम भाऊ मेश्राम,उपरवाही शाखा प्रमुख रामदास रामटेके, सुरज चाल, तोफिक शेख, गणेश देवी,गोविंदा वाघमारे, विकास माऊलीकर, संजय कोयलवार, राजेंद्र बसवत, एकनाथ नेहारे, शंकर गेडाम, अमीर खान, सुनील वाघोसे, सुनील शेरकुरे, प्रीतम वाघमारे, लक्ष्मण बच्चेलवार, अंबादास वाघमारे, सुमित सापडी, विक्रम रंगारी, मुन्ना, राहुल चांदेकर उपस्थित होते

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!