सिद्धार्थ दहागावकर (गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी)
गोंडपिपरी: तालुक्यातील सकमूर येथे अतिवृष्टीमुळे काही दिवसांपासून पाणी पूरवठा बंद आहे. त्यामुळे नाईलाजाने पुराने गढूळ पाणी सकमुरवासीय पीत होते. सकमूर वासीयांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सूधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सौ वैष्णवी अमर बोडलावार माजी जि प सदस्या चंद्रपूर, चेतनसिंग गौर नगरसेवक गोंडपिपरी, प्रविणजी बिरेवार, गटग्रामपंचायत सकमुरचे सदस्य संतोष मूगलवार, कोमल मुगलवार, जीवन अलोने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने पिण्याचे पाणी सकमुरवासीय जनतेला उपलब्ध करून देण्यात आले. त्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे…