Home Breaking News नालीच्या कामा अभावी गावात पाणी ; नागरिकांचे अतोनात नुकसान.. त्वरित नालीचे...

नालीच्या कामा अभावी गावात पाणी ; नागरिकांचे अतोनात नुकसान.. त्वरित नालीचे काम करा अन्यथा आंदोलन करू – मुन्नीर सय्यद.

534

 

बळीराम काळे (जिवती प्रतिनिधी)

जिवती : शेणगाव ते टेकामांडवा या रस्त्याचे काम उन्हाळ्यात पूर्ण झाले परंतु शेणगाव ते टेकामांडवा या मार्गावरील हिमायतनगर या गावात सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली चे बांधकाम असताना ही संबंधित कंत्राटदाराने हिमायतनगर या गावात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम केले परंतु नालीचे काम केले नाही त्यामुळे रस्त्यावरील सर्व पाणी गावातील इर्शाद नायुम शेख, गजू डावले यासह अनेक घरात पाणी घुसून अनेकांच्या घराची पडझड होऊन त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर येथील नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील रस्त्याचे सिमेंटीकरण झाले तेंव्हाच सिमेंट काँक्रीट नालीचे काम केले असते तर अशी परिस्थिती निर्माण झालीच नसती असे सामाजिक कार्यकर्ता मुन्नीर सय्यद व तेथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात आलेले मुरूमही पाण्याने वाहून गेले आहे. तसेच रस्त्याची उंचीही तीन ते चार फूट उंच केली आहे. त्यामुळे गावात अपघातही होऊ शकतात. सतत १३ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्याचे पाणी गावातील घरात घुसत आहे. हिमायतनगर येथील गावातील सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम व रस्त्याची साईट भरण लवकर करावे अन्यथा गावकरी जणआंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुन्नीर सय्यद यांनी तहसीलदार जिवती यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

Don`t copy text!