करंजीत दारुविक्री जोमात…दारुविक्रेत्याने जमा केली लाखो रुपयांची भांडवल

627

चेतन मंदाडे प्रतिनिधी

गोंडपिपरी :- तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीत करंजी शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची विक्री होत असल्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित होत आहे. करंजी, बोरगाव, धानापूर, जोगापूर या गावातील दारू शोकीन येतात.त्यामुळे याचा विपरीत परिणाम होऊन गावातील शांतता भंग होत आहे.तसेच तरुण मुलं व्यसनाधीन होत आहे. त्याचप्रमाणे महिला वर्गात यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.करंजी शिवारातील देशी दारूची विक्री करणारा व घरपोच दारू आणून देणारा या दोघांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी करंजी येथून ग्रामस्थानापासून पोलीस प्रशासनाला करण्यात येत आहे.