नागपुर:- नागपूर सिटिजन फोरम या सामाजिक संस्थतर्फे वृक्षारोपण महाअभियान व आषाढी एकादशी निमित्त रविवार 10 जुलै सकाळी 8 वा. के.टी नगर गार्डन फ्रेंड्स काॅलनी येथे तुळशी रोपटे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्राणवायूचा हमखास स्त्रोत व पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने तुळशीचे विशेष महत्व आहे. घरोघरी जर तुळशीचे रोपण झाले तर प्रदुषण कमी होण्यास मदत होईल.असे आवाहन नागपूर सिटिजन फोरम तर्फे करण्यात आले आहे.