Homeचंद्रपूरखा. धानोरकर विकासासाठी संघर्ष करणारे नेते. --माजी नगराध्यक्ष अरुण धोटे. धोपटाळा...

खा. धानोरकर विकासासाठी संघर्ष करणारे नेते. –माजी नगराध्यक्ष अरुण धोटे. धोपटाळा येथे खा. धानोरकरांचा वाढदिवस उत्साहात.

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर, धोपटाळा, सास्ती येथील नागरिकांच्या जनसंपर्कासाठी असलेल्या आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे विधानसभा समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुका अध्यक्ष रंजन लांडे यांच्या हस्ते केक कापून उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने नेहमी गोरगरीब जनतेच्या हितासाठी योगदान दिले आहे. खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे हे आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. खा धानोरकर हे विकासासाठी संघर्ष करणारे नेते असून ते नेहमी कार्यकर्त्यांच्या आणि तळागाळातील लोकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे नेते आहेत असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी अनंत एकडे, नागेश मेदार, विजय कनकाटे, विनोद कावडे, जगदीश बुटले, संदीप आदे, उमेश गोरे, विजय कुडे, माधव बोढे, देवेंद्र कल्लुरी, प्रभाकर बघेल, एकनाथ खडसे, अशोक कुडे, कुमार नरसिंग, बंडू भोयर, राजेश अवनुरी, संतोष शेन्डे, हारून शेख, कोमल पुसाटे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, श्रिकांत घोडसेल, रवींद्र लोहे, इरेल्ली अन्ना, आनंद अन्ना, मुन्ना कुडे, मधुकर पोनलवार, राजमौली मारमुला, अन्नया बाबु, रितेश मोहारे, रवी राऊत, नरसिंग भुपेली, ब्रिजेस जंगितवार, श्रीनिवास नागवेली, श्रिधर रावला, अबास अली, इकबाल, मंजुषा खंडाळे, संगीता हिवराडे, रेखा लिंगे, सुलोचना देवाळकर, इंदूताई जांभूळे श्रीनिवास नागवेली यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!