Home चंद्रपूर गोंडपिंपरी सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे...

सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष..

754

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकराच्या हैदोसामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता नेहरू गोंगले (चेकबापूर ) या महिलेवर डुकराने गावात शिरून हल्ला केला. परिणामी महिला गंभीर जखमी झाली. त्यामुळे गावातील जनतेत डुकरांच्या भीतीने दहशत निर्माण झाली होती.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने तात्काळ जखमी महिलेला आर्थिक मदत करावी व जंगलातील डूकरांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. असे निवेदन आज ग्रा. पं. सकमुरचे सदस्य श्री. संतोष रामय्या मुगलवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, धाबा यांना दिले होते

निवेदन देऊनही वनविभागाने कोणतेही कार्यवाही केली नसल्याने आज पुन्हा एकदा गावातील गिरीधर झाडे या व्यक्तीवर डुक्कराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. लवकरात लवकर वनविभागाने कारवाई करावी अशी समस्त गावकऱ्यांनी मागणी केली आहे…

Don`t copy text!