Homeचंद्रपूरसिंदेवाही तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवानी वडेट्टीवार यांची उपस्थिती

सिंदेवाही तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवानी वडेट्टीवार यांची उपस्थिती

वैभव आत्राम (सिंदेवाही तालुका प्रतिनिधी)

सिंदेवाही – तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिक यांच्या समस्या जाणून घेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्याने सिंदेवाही तालुक्यात आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांचे प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे जिल्हा महासचिव हरिभाऊ बारेकर, पालकमंत्री स्वीय सहाय्यक प्रदीप गद्देवार, काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सीमा सहारे, संजय गांधी निराधार अध्यक्ष सचिन नाडमवार, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता, गावळ, शाखा अभियंता चांदेकर, वानखेडे ,राठोड, शिंदे, नगरसेवक पंकज नन्नावार, नगरसेविका नीता रणदिवे, प्रतीक जाधव, कार्यालय प्रमुख अशोक सहारे , मोरेश्वर ज्ञानवाडकर ,जयश्री नागापुरे रूपा ताडूलवार, प्रशांत बनकर, ग्रा.प.किन्ही सरपंच कोमल गुरनुले उपसरपंच बालूजी गेडाम, कळमगाव (गन्ना )सरपंच मालता अगडे, उपसरपंच अविनाश नन्नावरे, पळसगाव (जाट) सरपंच जगदीश कामडी, उपसरपंच शंकर गायकवाड, गडमौशी सरपंच सोनाली पेंदाम उपसरपंच पूजा अलमवार, ग्रामपंचायत कचेपार सरपंच राणी देवतळे हस्तापसिंग जुनी प्रभाकर वाजूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

येणारा पावसाळी हंगाम हा शेती हंगाम असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोच मार्ग नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच पावसाळा हंगामात शेतापर्यंत शेती उपयोगी साधने तसेच खत पोहोचवण्यासाठी होत असलेल्या अडचणींचा विचार करून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी मातोश्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत तसेच काही ठिकाणी खनिज विकास निधीअंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी दिली. यात तालुक्यातील किन्ही येथील पांदन रस्ता (२५ लक्ष ), कळमगाव गन्ना पांदन रस्‍ता( 25 लक्ष), पळसगाव (जाट) येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता व पांदन रस्ता (५० लक्ष), कारगाटा- कच्चेपार पुल ३.८ कोटी, उद्घाटन व कच्चेपार येथे पांदन रस्ता (२५ लक्ष) कामांचा समावेश असून अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला.

फाईन पावसाळी हंगामाच्या पूर्वार्धात होऊ घातलेल्या विकास कामांमुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्याच्या विकासात भर पडली. यामुळे तालुक्यातील लाभार्थी शेतकरी वर्ग व ग्रामपंचायतीच्या विकासाचा मार्ग सुकर झाला असून शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्याने सोडवून नागरिकांना दिलासा दिल्याबाबत नागरिकांनी पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!