चंद्रपूर :- आझादी का अमृत महोत्सव निमित्त आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या हस्ते संपन्न झाले. महालॅब अंतर्गत हिंद लॅब संस्था यांचे कडून अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग दर्शविला. यावेळी हिंद लॅब संस्थेचे राहुल डी, पायल मॅडम उपस्थित होते.